Human Wellness-Importance of Gut Bacteria (Marathi )

by SLK Foundation

पिंडे पिंडे मतिर्भिन्ना व्यक्ती, व्यक्तीमध्ये भिन्न  “पिंड” असते; त्या अनुसार व्यक्तीची मतिपण भिन्न असते”, असा या संस्कृत वचनाचा  अर्थ आहे यासाठी “पिंड”  शब्दाचा अर्थ  समजून घेणे आवशयक आहे श्राद्ध  इ क्रियाकर्म करताना “पिंड” , म्हणजे भाताची  मुद करतात , मात्र ते  केवळ पिंडाचे प्रतीक आहे. पिंड शब्द दुसऱ्या अर्थानेसुद्धा  वापरला जातो. उदाहरणार्थ एखादी गोष्ट सतत करणे हा एका व्यक्तीचा “पिंड” आहे किंवा एखाद्या जागेच हवा-पाणी , त्याच्या “पिंडाला” मानवले नाही  यावरून “पिंड” हा प्रत्येक  व्यक्तीचा एक आंतरिक, अविभाज्य  भाग आहे हे समजते .

 “पिंडाला” इंग्रजीमध्ये “microbiome”  म्हणतात, “पिंड”  म्हणजे  आपल्या छोट्या  आतड्याच्या बाहेरील जैविक आवरण आणि त्याभोवती  वसत  असलेले जिवाणूचे कवच.

 “पिंड” मति  ठरवते ? होय  : मति किंवा विचार करण्याची पद्धत, मेंदूमधूनच येते  असं वाटणे साहजिकच  आहे. कारण मेंदू, विचार आणि बुद्धीचे केंद्र मानले जाते परंतु व्यक्तीची विचारपद्धती,इतकेच नाही तर, व्यक्तीचे  एकूण  आरोग्य , “स्व-भाव”, व्यक्तिमत्व या सर्वाची  जडणघडण  मुखतः पिंडावरच  अवलंबून असते, असं या  विषयातील तज्ज्ञ सांगत आहेत. *(संदर्भ १ पहा  )

Gut (gastrointestinal  tract )  म्हणजे  सर्व  पचन संस्था (तोंडापासून गुदद्वारापर्यंत. जाणारा मार्ग) .Gut  म्हणजे प्रामुखयाने ओटीपोट Guts या शब्दाचा दुसरा अर्थ इंग्रजीत आहे,  तो म्हणजे धाडस  ” No guts no glory ” संस्कृतमध्ये समानार्थी सुभाषित आहे “साहसे श्री::प्रति वसती”  साहसी माणसाकडे संपत्ती येते पण धैर्य किंवा साहस, हे डोक्यातून नव्हे तर ओटीपोटातून उपजत असते उदा. जेव्हा आपल्यावर आणीबाणीचा प्रसंग येतो, (मानसींक  तणाव,  वगैरे ) तेव्हा  ओटीपोटात  ढवळ्ल्यासारखे  होते. अशावेळी हातपाय गळून जातात पण मनोधैर्य बळकट असलेली व्यक्ती, खंबीरपणे उभे राहून परिस्थितीशी सामना करते .

“वेगस” नावाचा एक मज्जा तंतू  आपल्या मेंदूला आणि ओटीपोटातील पिंडाला जोडतो. हा एक अपवाद सोडला तर, मेंदू हा निर्वात  कवटीत  ,बंदिस्त  असतो. वेगस मज्जातंतू  मेंदूला , शरीरातील सर्व अवयवांची माहिती नित्यनेमाने पुरवते. मेंदूवर विशिष्ठ निर्णय घेण्याचा  प्रभावसुद्धा टाकते. माणसाची एकूण निर्णयक्षमता पिंडच  ठरवित्  असतो

उंदरांची  पोहोण्याची परीक्षा : काही उंदरांना एका तलावात पोहोण्यासाठी सोडले असताना, असं दिसले; काही “आशावादी” उंदीर शेवटपर्यंत नेटाने पोहत जातात तर काही :निराशावादी” उंदीर  मात्र मध्येच पोहोण्याचे सोडून देतात  पण  जेव्हा धैर्यवान (आशावादी)  ऊंदीरांच्या Gut, ओटीपोटातील जिवाणूची, भित्र्या    (निराशावादी) उंदरांच्या  जिवाणूंशी आदलाबद्ल केली  असता , भित्रे उंदीर,  बिनधास्त झाले, शेवटपर्यंत पोहत गेले. याउलट आधी शेवटपर्यंत पोहोणारे उंदीर , आता मात्र , मधेच  गर्भगळीत झाले , त्यांनी पोहोणे सोडून दिले.

स्वभावाला औषध नाही असे म्हणतात पण पिंडातील जिवाणू हे स्व”भाव” बदलण्याचे औषध आहे

व्यक्ति तितक्या प्रकृति  ओटीपोटातील आतड्याभोवतील जिवाणू, व्यक्तीची  प्रकृति ठरण्यामागचे मुख्य कारण आहेत  विशिष्ठ जातीमध्ये काही गुण, विशेष  प्रकर्षाने . आढळन्याचे  कारण,  ओटीपोटातील जिवाणूच  असतात. जशा माणसांच्या जाती आहेत, तशा या जिवाणूंच्यासुद्धा प्रजाती असतात.

पिंड आसपासच्या परिस्तिथिनुसार बनतो, बदलतो, आईवडिलांकडून आपल्याला समसमान गुणसूत्रे असलेले ,जनुक मिळते.(genome ). जन्म  झाल्याझाल्या , या जनुकासह परिसरातील जिवाणू, सहवास करायला लागतात (biome ) आणि  लहान आतड्यामघे पिंड (micro-boime )वाढायला लागतो.नैसर्गिक प्रसूतीमध्ये , बाळाला मुख्यतः मातेकडूनच  पिंड मिळत असतो. याउलट, शस्त्रक्रियेद्वारा प्रसूती झाल्यास, बाळाला पहिला स्पर्श, परिचारिकेचा होतो. मग बाळाला पहिले  जिवाणू त्या व्यक्तीकडून मिळतात, ज्यांचा सर्वात आधी स्पर्श होतो   नंतर, जशी बाळाची वाढ होते, तसे झपाट्याने पिंडामध्ये, भोवतालच्या परिसरातील जिवाणू येतात., बाळाचा  पिंड कायम बदलत असतो आणि बाळाचा रक्त गट यावरूनच ठरतो

यत् पिंडे तत ब्रहमांडे  (पिंडी ते ब्रम्हाण्डी.)  पिंडात, सर्व जगातील  जिवाणू , कुठून कुठून येतात. कसे ?  मोठे नवलच आहे! मुखतः खाण्यापिण्यामुळे,  जीवन पद्धतीने  (आहार, आचार  आणि विचारांमुळे) पिंड बदलतो 

पिंडाचे जतन करण्यासाठी काय करायचं ?  ज्या अन्न पदार्थात fibre (चोथा) असतो , ते अन्न, पिंडाचे संवर्धन करते. याउलट मैद्यापासून बनविलेले पदार्थ, पिंडाचा ऱ्हास  करतात. कोविड १९ मुळे, आपण स्वच्छतेच्या बाबतीत विशेष जागरूक झालोत. मात्र पिंड-संवर्धनासाठी अति स्वच्छता बाधक असते उदा पिण्याचे पाणी. उकळून थंड केलेल्, शुद्ध पाणी आरोग्याला चांगले असेल असं वाटते परंतु  पिंडाला साधे नळाचे , काहीसे अशुद्ध पाणीच मानवते. खाण्यापिण्याच्याबाबतीत  स्वछतेचा अतिरेक  टाळायला पाहिजे. .वाईट मानलेले सूक्ष जिवाणूपण, कमी प्रमाणात, रोग प्रतिकारशक्ती वाढवतात ,जशी  लस (vaccine ) काम करते.

अँटिबायोटिक्स (प्रतिजैविके ) रोग प्रतिकारासाठी सर्रास वापरली जातात भारतात ती कोंबड्याना खुराक म्हणून  दिली जातात, कोंबड्याचे वजन लवकर वाढन्यासाठी. अँटिबायोटिक्स नावातच त्याचा परिणाम दिसतो. Anti-bios  म्हणजे पिंडाच्या सूक्ष्म जीवाणूंना मारक.या पतिरोधक औषधामुळे, पिंड आणि त्याच्या भोवती असणाऱ्या जीवाणूंना, मोठी इजा पोहोचते.पिंडाची हानी भरून यायला बराच अवधी जातो त्यासाठी जीवनसत्वे,  प्रोबायोटिक्स उपयोगी पडतात.  प्रोबायोटिक् म्हणजे ज्यात जिवंत, चांगले जिवाणू असतात (उदा दही , ताक), ज्यामुळे पोटातील चांगले जिवाणू वाढीला लागतात. याउलट  दारू पिण्यामुळे पिंडाची हानी होते..कोणत्याही व्याधीचा सर्वात आधी परिणाम पिंडावर होतो आणि पोटात बिघाड दिसून येतो.

मानसिक रोग, जसे ओदासिन्य , यातही आधी पोटामध्ये  गडबड होते. मग मेंदूतील रसायने बिघडतात  मानसिक रोगावर उपचार करण्यासाठी , जी औषधे वापरतात, त्यांचा  पिंडावर तसेच मेंदूवर, एकसारखाच परिणाम होतो. मानसिक रोगावर उपचार करण्यासाठी जर पिंडावर उपचार केले तर, रोग  लवकर बरा होउ शकतो.

निरोगी पिंड आणि त्याभोवती असणारे जिवाणू, “लाख मोलाचे” आहेत . रक्तदान , वीर्यदान असे शब्द प्रचलित आहेत  आता  पिंडदान. FMT (fecal microbial transplant )  म्हणजे निरोगी माणसाच्या पिंडातील जिवाणू, रोगी माणसाच्या पिंडाला उपचार म्हणून वापरत आहेत .त्यासाठी  मलपेढ्या, पाश्चात्य देशात आल्या आहेत.हा autoimmune  disorders  वर  उत्तम उपाय आहे.आपल्या मेंदू इतकीच  प्रगत मज्जासंस्था , आपल्या ओटीपोटात(enteric nervous system ) आहे.या बुद्धीला   intuitive , instinctive brain , अवधान  असे  म्हणता येईल

Terrain is  everything लुई पाश्चर याने लावलेल्या बुरशीवरील शोधामुळे प्रतिजैविकांचा विकास झाला पण  पाश्चरने शेवटी मान्य केले की रोग होण्यास कारणीभूत विषाणू, जिवाणू  नसून, शरीरातील वातावरण आहे पिंड आणि  शरीराच्या आतील वातावरण घडविणारे जिवाणू , आपली नैसर्गिक प्रतिरोधक शक्ती आहे. आजकाल सोशल मीडिया वर “आभासी मित्र” असतात पण आपले खरे सामाजिक, सहजीवी  साथीदार , पिंडाचे जिवाणूच आहेत ; जे जन्मभर साथ देतात, आपल्या जीवाला वेषटून असतात.

“मृदुनि दारुणाम हंन्ति”   पिंडातील जिवाणू आपल्या आरोग्याचे सर्व रोग बांधापासून आपले  संरक्षण  करतात. अतिशय मृदूपणे तरीही प्रभावीपणे. शरीराला कोणतीही इजा न पोहोचता. पिंडातील जिवाणू ,  आपली रोगप्रतिकाराची पहिली फळी आहे.याउलट रोग निर्माण करणाऱ्या विषाणूशी, आक्रमक भूमिका घेतल्याने प्राणहानी होते, हे कोविड१९ च्या उपचारपद्धतीमध्ये  दिसले (cytokine  storm  )

पिंड आपल्या आई वडिल, पूर्वजांकडून मिळालेला बहुमूल्य ठेवा आहे  याचे चांगले जतन संगोपन संवर्धन केल्यास ,जीवनपद्धतीशी निगडित ,अनॆकविध रोगापासून मुक्ती मिळवता येईल उदा लठ्ठपणा, मधुमेह, विविध ऍलर्जी , सांसर्गिक रोग , मानसिक रोग (बेचैनी, औदासिन्य, बायपोलर ) तसेच  पचनसंस्थेच्या  व्याधी  (बद्धकोष्ठता, IBS , संग्रहींणी, आम्लपित्त, इ ) 

पिंडाचे संवर्धन करा : वातावरणातील  जिवाणू आपल्या”विरुद्ध” नाहीत तर आपले “बिरुद आणि सुहृद ” आहेत. त्यांच्यामुळेच माणसाचे अस्तित्व टिकून आहे. त्यांच्याशिवाय माणूस क्षणभरही जगू  शकणार नाही. त्यांच्याशी लढाई न करता, गुण्यागोविंदाने

CLICK HERE TO READ FULL ARTICLES

You may also like

SLK foundation

“Creating Wealth from Waste”
SLK Foundation is more than 25 years old registered charitable trust, with a mission statement – “Creating Wealth from Waste“. SLK Foundation is named after Late S.L Kirloskar, doyen of the Kirloskar group, to commemorate his memory. Pankaj Narayan Pandit, is founder and managing trustee of SLK Foundation.

Contact Details

@2023 SLK Foundation – All Right Reserved.
Designed By Site Invention

SLK foundation

“Creating Wealth from Waste”
SLK Foundation is more than 25 years old registered charitable trust, with a mission statement – “Creating Wealth from Waste“. SLK Foundation is named after Late S.L Kirloskar, doyen of the Kirloskar group, to commemorate his memory. Pankaj Narayan Pandit, is founder and managing trustee of SLK Foundation.

Contact Details

@2023 SLK Foundation – All Right Reserved. Designed By Site Invention

× Chat with us