पृथ्वीवरील जीव सृष्टी; एक आश्चर्य विश्वात अगणित आकाशगंगा, सूर्यासारखे तारे, ताऱ्याभोवती फिरणारे पृथ्वीसारखे ग्रह, त्यांचे चंद्रासारखे उपग्रह आहेत परंतु पृथ्वीव्यतिरिक्त इतर कोठेही,जीवसृष्टीसाठी अनुकूल वातावरण नाही लाखो वर्षात झालेले नैसर्गिक उत्पात, वातावरण बदल , युद्धे , मानवी हस्तक्षेप , अशा सर्व आपत्तींना पुरून उरलेली , आपल्या ग्रहावरील जीवसृष्टी , आज नवीन संकटाला तोंड देत आहे हवामान बदल, जो सर्वस्वी मानवी हस्तक्षेपामुळे झालेला आहे
निसर्गाचे घड्याळ, अनंत काळापासून संथ गतीने , अव्याहतपणे चालू आहे शास्त्रज्ञाच्या मते, पृथ्वीचे वय ४६० करोड वर्षे आहे एक दश करोड = एक प्रमाण वर्ष, या प्रमाणाने,पृथीवर मानव वंश सुरु होऊन फक्त चार तास झाले आहेत ; आद्योगिक क्रांती होऊन फक्त एक मिनिट. या अवधिमध्ये , पृथीवरील ९०% अधिक जैव वैदिध्य , वन्य प्राणी प्रजाती , ५०% पेक्षा जास्त जंगले नष्ट झालीत वातावरणातील हरितगृह निर्माण करणाऱ्या वायू घटकांचे प्रमाण* ५० पासून ४०० ppm च्या पार गेले (part per million ) (*तक्ता १पहा)
पंचमहाभूते (सजीव सृष्टीचे पाच विभाग): पृथ्वी, जल आणि वायू (वातावरणाचे कवच) अशा ३ महाभूतांवर मानवी प्रदूषणाचा दुष्परिणाम झाला आहे मुलंद्रव्यांची महाभूतातील मूळ जागा बदलली आहे; निसर्ग अशा विपरीत गोष्टीतूनसुद्धा चांगला परिणाम काढतो मात्र चुकीच्या जागी, वस्तू सातत्याने वाढत गेल्या , तर मात्र प्रदूषणाचा प्रश्न उभा राहतो
१. पृथ्वी >वायू : जमिनीतील खनिज प्रक्रिया करून , (कोळसा जाळून वीज निर्मिती , खनिज तेल, वाहन चालवण्यासाठी इंधन) म्हणून वापरल्यामुळे कार्बन , नत्राचे संयुगे, गंधक (सल्फर), शिसे, (जे आधी जमिनीत सुप्त होते), ते वायूरूपाने वातावरणात मुक्त झाले “हरितगृह परिणाम” मुळे पृथ्वीवरील तापमान वाढवू लागले पंजाब, हरियाणा येथे पाणी मुबलक म्हणून उन्हाळी भात, या सारखी पिके घेतली जातात मग गहू पिकाचा राहिलेला अंश जाळला जातो त्यामुळे उत्तर भारतातील शहरात वायू प्रदूषण होते हिवाळ्यात नवी दिल्ली हे राजधानीचे शहरच नाही तर भारतातील उत्तेरेकडील बहुतेक सर्व शहरातील हवा , PM 2.5 मान्यताप्राप्त मर्यादेपेक्षा , दहा ते पंधरा पट, प्रदूषित असते त्यामुळे दमा, श्वसनाचे रोग बळावून लाखो लोक मृत्यू पावतात. हवा वातानुकूल करण्यासाठी जे CFC वायू वापरले जातात, ते सर्वात जास्त हरितगृह परिणाम करतात(*तक्ता १पहा)
२. पृथ्वी >जल : अधिक पिके घेण्यासाठी , संकरित बियाणे , रासायनिक खते विषारी कीटक नाशके ; भांडी घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी साबण वापरू लागलो त्यातील मूलद्रवे , स्फुरद , क्लोरीन , नत्रयुक्त सांडपाणी, वाहत्या पाण्यासोबत , नद्यांत, तलावात,शेवटी समुद्रात येतात
| तक्ता १ हरितगृह वायू Ref IPCC | तापमानवाढ मापक क्षमता (१००वर्षे) |
| CO2 | १ |
| मिथेन | २३ |
| N2O | २९६ |
| HFC | १२००० |
| SF6 | २२००० |
GHGs-Potential of warming
३. पृथ्वी >जल : खनिज-तेल उद्योगातील टाकाऊ पदार्थातून , प्लास्टिकसारख “सह-उत्पादन” गवसले ; त्याचा वापर , ग्राहकोपयोगी वस्तू विकताना, आवरण म्हणून होऊ लागला आज दर वर्षी ७० लाख टन प्लास्टिक कचरा समुद्रात टाकला जातोय (ref UNEP ) सांडपाणी प्रक्रिया न करता , सोडल्याने भूपृष्ठावरील पाणी प्रदूषित झाले सांडपाण्यातील द्रव्ये , मुखतः नत्र पदार्थ, खरे तर पिकांचे पोषण करतात पण ते चुकीच्या जागी, म्हणजे पाण्यात ढकलले गेल्याने , समस्या निर्माण झाल्या मग भूगर्भातील खोल, शुद्ध पाण्याचा उपसा सुरु झाला
४ पृथ्वी >वायू : शेती, लाकूड, कागद अशा गरजां भागवण्यासाठी , शहरीकरणासाठी, मोठी घराणे बांधण्यासाठी जंगल तोड झाली अजूनही शेतीसाठी , गोमास निर्यातीसाठी (अमेझॉन नदीच्या खोऱ्यात) मोठी जंगल तोड चालूच आहे. वृक्ष त्यांच्या खोड,बुंध्यामध्ये कार्बनला साठवून ठेवतात , मात्र लाकडे जाळल्यावर, कार्बन पुन्हा हवेत मुक्त होतो मोठाली धरणे बांधताना , लाखो झाडे पाण्यात गाडली जातात ती कुजल्याने , त्यातून मिथेन हा विषारी, हरितगृह वायू वातावरणात सुटतो
५पृथ्वी >अंतराळ हेरगिरी, दूरसंचार, दळण वळण, दूरदर्शनसाठी, अंतराळात उपग्रह सोडायची सुरवात , अवघ्या पन्नास वर्षांपासून सुरु झाली आता तेथील अंतराळातील कक्षात इतकी भाऊगर्दी झाली आहे की उपग्रहांच्या टकरीमुळे तेथील हवेमध्ये तरंगत्या वस्तूंचे अवशेष मोठया प्रमाणावर झालेत ते कधीकाळी , पृथ्वीपर्यंत येतील .
पृथ्वीचा बिघडलेला समतोल : पुढील तीस ते पन्नास वर्षात पृथ्वीचे सरासरी तापमान २.५ ते ४ अंश सेल्सिअस वाढेल सध्या तापमान फक्त फक्त सरासरी १. ०९ अंश सेल्सिअस वाढले आहे. बघा, काय त्रास होतो आहे ! दर वर्षी सर्वाधिक तापमानाचे उच्च-अंक मोडले जात आहेत हिम नगांचे वितळणे , जगभर अवकाळी पाऊस, अतिवृष्टी-ढगफुटी, महापुरांचे थैमान, तापमान वाढीमुळे पेटणारे वणवे , दुष्काळ, चक्री वादळे. वेगवेगळे विषाणू-साथीचे रोग , जास्त विजा कडाडणे/पडणे
निसर्गाच्या शब्दकोशात प्रदूषण शब्दच नाही जीव सृष्टीची उतरंड अशी आहे की एका जीवाचे उत्सर्जन हे दुसऱ्या जीवाचे खाद्य असते सर्वच मात्र औद्योगिक क्रांती झाल्यानंतर, खनिज उर्जेवर आधारित, अर्थव्यवस्था उदयास आली औष्णीक वीज निर्मिती, वाहन उद्योग, बांधकाम, शहरीकरण, शेतीचे यांत्रिकीकरण, खनिज तेलाचा वापर , बेसुमार जंगल तोड, या मानवी हस्तक्षेपामुळे, प्रदूषणाचा भस्मासुर निर्माण झाला
निसर्गाची ऋण एंट्रोपी–अधिकस्य अधिकं फलं: जगातील जड वस्तुमान आणि ऊर्जा यांची अंतिम बेरीज कायम आहे फक्त ऊर्जेचे स्वरूप बदलते मानवी जगात, वापरून झालेली ऊर्जा निरुपयोगी असते निरुपयोगी उर्जेला, अनावस्था, एंट्रोपी(entropy) म्हणतात याउलट निसर्ग मात्र अशा निरुपयोगी गोष्टीला, हळूहळू पुन्हा उपयोगी करतो उदाहरणार्थ
- गाडलेल्या सेंद्रिय कचऱ्यापासून मिथेन
- हवेतील कार्बन कणापासून , (हरितकण व सूर्यप्रकाशच्या साहाय्याने) वृक्षवल्ली, अन्नधान्य वाढवून सर्व प्राणिमात्रांचे पोषण , वातावरणातील कार्बनच्या प्रमाणाला कमी करतो
- जमिनीखालील जीवाणूंच्या साहाय्याने, हवेतील नत्रवायूला जमिनीत आणून, धान्ये पिकवितो
- आज तयार झालेली खनिज तेलसुद्धा गाडल्या गेलेल्या झाडांपासून झाले आहेत
“आकाशात पतितम तोयं, यथा गच्छति सागरम” सर्व सेंद्रिय गोष्टीना निसर्ग सुफळ , संपूर्ण बनवितो आकाशातून पडणारे पावसाचे पाणी हे सर्वात शुद्द असते एकाच पावसाळ्यानंतर नद्या नाले, हवादेखील शुद्ध होते समुद्र पावसाळ्यात, भरतीच्या वेळेस, फेकलेले प्लास्टिकजन्य पदार्थ, विसर्जन केलेल्या POP च्या मूर्ती , पुन्हा किनाऱ्यावर फेकून देतो मात्र माणूस लवकरच हवा , पाणी , पुन्हा प्रदूषित करतो.
पृथ्वीचे अरण्यरुदन श्रीमंत राष्ट्रांचे हितसंबंध, सुखवस्तू लोकांची चंगळवादी प्रवृत्ती , राजकारण्यांची पर्यावरणाबद्दल बेपर्वाई , सामान्य नागरिकांची अनास्था या पर्यावरण विनाशाला कारणीभूत आहेत जेव्हा सर्वांना जागं येईल तेव्हा? तापमान वाढीमुळे हिमनग वितळून , समुद्राची पातळी वाढेल; किनाऱ्यावरील मानवी दाट वस्ती असलेली शहरे , प्रलयासारख्या महापुराच्या धोक्यात येतील गरीब राष्ट्रातील , लोकांसमोर उदरनिर्वाहाच्या समस्या उद्भवतील.
तुझे आहे तुजपाशी,परी तू जागा चुकलासी Pollution is due misplaced resources. सर्वसमावेषक निसर्गाला कामाला लावले तर सर्व प्रश्न सोडवता येतील*( *पहा पर्यावरण-तारणाचेकोष्टक)
CLICK HERE TO READ FULL ARTICLES