Changing Lifestyles and Ecological Degradation (Marathi)

by SLK Foundation

आज मनुष्य प्राणी बहुसंख्येने “शहरी भागात राहणारा”: लाखो वर्षांपूर्वी जेव्हा मानवप्राणी, शिकार करायचं सोडून, शेतीकडे वळला तेव्हा अन्न, वस्त्र , निवारा या माणसाच्या तीन  मूलभूत गरजा निर्माण झाल्या. शेती करणारा, बारा बलुतेदार  माणूस ग्रामीण भागात राहत असे परंतु  आद्योगिक क्रांती  झाल्यानंतर , शहरे फोफावत गेली ग्रामीण भागातून शहराकडे, मानवी लोकसंख्येचा ओघ चालू झाला आणि कायम चालू आहे  शहरी भागातील माणसांच्या अंतर्भूत गरजा वाढल्या

  • वीज निर्मिती(औष्णीक)
  • वाहन उद्योग (खनिज तेलावर चालणारा)

या उद्योगाची मागणी दिवसेंदिवस वाढत गेली या उद्योगाला पुरवठा म्हणून जमिनीखालील कोळश्याच्या खाणीचा , खनिज तेलाच्या साठ्यांचा शोध सुरु झाला खनिज-तेल शुद्धीकरणातून, प्लास्टिकसारखा बहुगुणी पदार्थ, सह-उत्पादन(byproduct) मिळाला त्याचा पदार्थ विकण्यासाठी, आवरण म्हणून, विविध  वस्तू बनविण्यासाठी वापर सुरु झाला प्लास्टिक जन्य  आणि इतर मानव निर्मित पदार्थ (काच, धातू)यांची  विल्हेवाट लावण्याची जबाबदारी , निसर्गावर सोपविली प्लास्टिकचे उत्पादन-मूल्य  “नगण्यच” पण अयोग्य विल्हेवाट लावल्याने त्याचे उपद्रवमूल्य “मोठे” आहे

जमिनीचे, पाण्याचे प्रदूषण: पूर्वीपासून गावातील कचरा, गावकुसाबाहेर, उकिरड्यावर फेकायची पद्दत होती त्याकाळात घरगुती कचरा, मुख्यतः सेंद्रिय पदार्थांचा होता कालांतराने त्याचे विघटन , नैसर्गिक खतामध्ये व्हावयाचे बदलत्या राहणीमानामुळे, घरगुती कचऱ्यात, सेंद्रिय पदार्थ कमी होत जाऊन, मानव निर्मित,( प्रामुख्याने प्लास्टिकजन्य पदार्थ) वाढू लागले मानवनिर्मित गोष्टीचा साठा, नगरांच्या सीमेबाहेर वाढत जातो, याचे विषारी डोंगर तयार होतात विषारी लिशेत(leachate)मुळे पाणी, हवा  प्रदूषित होते

अमेरिकेसारख्या देशात, धुण्याच्या साबणातील स्फुरदाचे प्रमाण कमी ठेवणे बंधनकारक आहे मात्र भारतात पर्यावरण मंत्रालय निष्क्रिय, उदासीन तर धुण्याचे साबण बनविणारे बहुराष्ट्रीय उत्पादक बेपर्वा आहेत भारतात दर वर्षी धुण्याच्या साबणातून १४६००० टन स्फुरद पाण्यात सोडले जाते*(Ref CSE, CPEB)

 “रोज मरे त्याला कोण रडे” : भारतातील सर्व महानगरांच्या सीमेबाहेर, मुंबई (गोवंडी, मानखुर्द), बंगलोरमध्ये (मितगनहळ्ळी मंडूर, बेल्लाहळ्ळी ), दिल्लीत, कचऱ्याचे डोंगर वाढत आहेत, त्यात मिथेन वायू  निर्माण झाल्यामुळे आग धुमसत राहते, धुण्याच्या साबणातील स्फुरद, सांडपाण्यातील  नत्र, पाण्याला फेस आणते बंगलोरच्या तलावांना (बेलंदूर, वरथुर ) आगी लागतात त्यात नावीन्य नसल्याने या बातम्या वर्तमानपत्र देत नाहीत

उत्पादकाची विस्तारित जबाबदारी (Extended Producers Responsibility) बनविलेल्या वस्तूचा अनुशेष पुन्हा प्रक्रियेसाठी वापरण्यासाठी, वापरून नष्ट करण्याची. उत्पादकांनी ही जबाबदारो झटकून टाकली आहे सर्व मानव निर्मित गोष्टीचा अनुशेष, पुन्हा ती वस्तू बनविण्यासाठी वापरला जाऊ शकतो. वर्तमानपत्राची रद्दी , कचऱ्यात फेकलेली दिसत नाही कारण आपण ती रद्दी महिनाभर  जमा करून मग रद्दी दुकानात विकतो  तशीच व्यवस्था सर्व मानवनिर्मित गोष्टीसाठी करणे जरुरू आहे

ग्राहकांना ग्राहकोत्पादक (pro-sumer)होण्याची जरुरी आहे

१ प्लास्टिकजन्य पदार्थांचे  १००% पुन्हाप्रक्रिया

२  प्लास्टिक(ज्वलन-मूल्य कोळशापेक्षा जास्त) जाळून वीज निर्मिती

३ प्लास्टिक, डांबरात मिसळून टिकाऊ रस्ते

शहरात  दिसणारे , कचरा गोळा करणारे गरीब , यात  मोठी भूमिका निभावू शकतात उत्पादकांनी, नागरिकांनी आर्थिक लाभासाठी नव्हे तर पर्यावरणाच्या भल्यासाठी, सामाजिक बांधिलकीसाठी हे करणे जरुरी आहे

 पर्यावरण संवर्धनासाठी केलेले खालील कायदे कागदावरच आहेत या कायद्यांची सक्त अंमलबजावणी करण्यात राजकारणी , नोकरशहा याना अजिबात रस नाही

१ सोसायटीच्याच आवारात सेंद्रिय कचऱ्याचे खत करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे

२ एकदा वापरून फेकायच्या प्लास्टिकचा वापर बंद (५०  मिक्रोनच्यापेक्षा कमी जाडीच्या पिशव्या ,चमचे , ग्लास , बश्या , थर्मोकॉल , स्ट्रॉव,)

३ जेथे जागा मिळेल तेथे कचरा : बंगलोरची महापालिका अभिमानाने सांगते “बंगलोर शहरात, कचऱ्याच्या पेट्याच नाहीत” बारकाईने बघितले तर,  झाडांभोवती रस्त्याच्या कडेला, उड्डाणपुलाखाली , कचरा फेकलेला दिसतो.

४ केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड सांगते, भारतात७२% सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जाते पाण्याच्या जागितिक प्रतवारीत, १२२ राष्ट्रांमध्ये,  भारताचा क्रमांक १२० लागतो

५ पवित्र गंगेसह, सर्व नद्या आज गटार-गंगा झाल्या आहेत नद्यांचं पाणी पिण्यायोग्य तर नाहीच पण स्नानायोग्य पण नाही   

धार्मिक गोष्टींचे हिडीस स्वरूप सार्वजनिक गणपतीच्या मूर्ती, POP,रासायनिक रंग वापरून बनू लागल्या विसर्जनानंतर , देशात ठिकठिकाणी लाखो जलचर मृत पावतात तरी असे सण चालू ठेवण्याचा अट्टाहास का? मूलतः निस्रगाशी निगडित सण , आता पाणी आणि हवा प्रदूषण करू लागलेत, कारण आपण निसर्गाच्या विपरीत राहतो आहे; निसर्गाशी असलेली नाळ तुटली आहे.  

पर्यावरण  संवर्धनाचा परमार्थ -कचऱ्याला सद्गती; ज्यामध्ये आहे पुढच्या पिढीचा स्वार्थमुंग्या, मधमाश्या अशा कमी उत्क्रांत झालेल्या कीटकांमध्ये, वंश टिकविण्याची  सामायिक बुद्धी असते सर्वच प्राचीन पुरातन (विमुक्त, भिल्ल) संस्कृतीमध्ये, निसर्गालाच देव मानले, ओरबाडून लुटलं नाही याउलट  शहरातील लोकांकडे पैशाची वाहती गंगा असल्याने .हा समाज पर्यावरणविषयक असंवेदनशील आहे , “पैसा हाच परमेश्वर” असे समजतो

शून्य कार्बन फूटप्रिंट –शून्य घन कचरा/सांडपाणी

  • आपल्या आवारात , सेंद्रिय कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर करणे  (उष्ण कटिबंधीय हवामानात सोपे)
  • कमी  वापर , पुन्हा वापरपुनःप्रक्रिया , पुन्हा निर्माण या तत्वावर मानवनिर्मित घनकचरा , प्रदूषण ,शुद्ध पाणी , वीज यांचे नियमन
  • निरंतर , हरित सौर ऊर्जा वापरणे (छपरावर सूर्यापासून वीज ,पाणी तापवण्याचे सयंत्र)
  • Ecosan  पद्धतीची शौचालय  (पाणी वाचवून , अत्यल्प सांडपाणी) ,

हे सर्व अंगिकारण्यामध्ये  पैशाची बचत आहेच पण परिवारणाचा ऱ्हास टाळण्याचे सोपे उपाय आहेत 

CLICK HERE TO READ FULL ARTICLES

You may also like

SLK foundation

“Creating Wealth from Waste”
SLK Foundation is more than 25 years old registered charitable trust, with a mission statement – “Creating Wealth from Waste“. SLK Foundation is named after Late S.L Kirloskar, doyen of the Kirloskar group, to commemorate his memory. Pankaj Narayan Pandit, is founder and managing trustee of SLK Foundation.

Contact Details

@2023 SLK Foundation – All Right Reserved.
Designed By Site Invention

SLK foundation

“Creating Wealth from Waste”
SLK Foundation is more than 25 years old registered charitable trust, with a mission statement – “Creating Wealth from Waste“. SLK Foundation is named after Late S.L Kirloskar, doyen of the Kirloskar group, to commemorate his memory. Pankaj Narayan Pandit, is founder and managing trustee of SLK Foundation.

Contact Details

@2023 SLK Foundation – All Right Reserved. Designed By Site Invention

× Chat with us